14 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो
भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच, 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, ज्यामुळे भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर हिंसा, दंगल, आणि स्थलांतर घडले. या फाळणीने लाखो लोकांचे जीव घेतले आणि कोट्यवधींना निर्वासित केले. या इतिहासातील दु:खद प्रसंगाच्या स्मरणार्थ, भारत सरकारने दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी 'फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला.