18 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


18 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराने क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूबचे 'पॅरा-ड्रॉप ऑपरेशन' किती उंचीवर केले आहे?
उत्तर: 15 हजार फूट उंचीवर.
माहिती: हे ऑपरेशन भारतीय सैन्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीत जवानांना तत्काळ उपचार देण्याच्या दृष्टिकोनातून 'क्रिटिकल ट्रॉमा केअर क्यूब' अत्यंत उपयुक्त आहे. या उपकरणाच्या साहाय्याने तातडीने जखमींवर उपचार करता येतात.

2) 18 ऑगस्ट रोजी चेन्नई येथे कोणत्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर: सागरी बचाव समन्वय केंद्र (Maritime Rescue Coordination Centre).
माहिती: या केंद्रामुळे समुद्रात संकटात सापडलेल्या जहाजे आणि मच्छीमारांना जलद मदत मिळू शकते. तटरक्षक दलाला या केंद्राच्या मदतीने अधिक चांगला समन्वय साधता येईल, ज्यामुळे बचाव कार्यात गती येईल.

17 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


17 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1)  राष्ट्रीय अननस रस दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर: दरवर्षी 17 ऑगस्ट रोजी.
माहिती: हा दिवस अननस रसाच्या आरोग्यदायी गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी साजरा केला जातो. अननसामध्ये असणारे विटामिन C, मॅग्नेशियम, आणि अँटिऑक्सिडंट्स यामुळे हे फळ शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी आणि पचनासाठी महत्त्वाचे आहे.

2) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
उत्तर: मल्याळम चित्रपट 'अट्टम'.
माहिती: 'अट्टम' हा मल्याळम चित्रपट उत्कृष्ट दिग्दर्शन, कथा, आणि अभिनयामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

16 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


16 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


प्रश्न: 'राष्ट्रीय स्वतंत्र कामगार दिन' भारतात कधी साजरा केला जातो?उत्तर: दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी.
माहिती: हा दिवस भारतात कामगारांच्या हक्कांचे आणि योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.

प्रश्न: इस्रो कोणत्या दिवशी 'स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल' (SSLV) वरून पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करेल?
उत्तर: 16 ऑगस्ट रोजी.
माहिती: इस्रोच्या SSLV चा हा उपग्रह प्रक्षेपण प्रकल्प पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त आहे.

15 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


15 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 78 वा स्वातंत्र्यदिन

2) थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने कोणाची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली आहे?
उत्तर - पंतप्रधान 'श्रेथा थाविसिन'

14 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


14 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो

भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच, 1947 मध्ये देशाची फाळणी झाली, ज्यामुळे भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर हिंसा, दंगल, आणि स्थलांतर घडले. या फाळणीने लाखो लोकांचे जीव घेतले आणि कोट्यवधींना निर्वासित केले. या इतिहासातील दु:खद प्रसंगाच्या स्मरणार्थ, भारत सरकारने दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी 'फाळणी होरर्स रिमेंबरन्स डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला.

13 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


13 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी कोणता दिवस जगभरात साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक अवयवदान दिन

2) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी कोणती संस्था एकंदर श्रेणीत अव्वल स्थानावर आहे?
उत्तर - 'IIT मद्रास'

12 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


12 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जगभरात   कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय युवा दिन

2)नुकतेच राष्ट्राध्यक्ष 'पॉल कागामे' यांनी चौथ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे?
उत्तर - रवांडा

3) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे?
उत्तर - भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता 'अभिनव बिंद्रा' 

4) हरियाणामध्ये  पहिली ' ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग' केव्हा सुरू होणार आहे?
उत्तर - सप्टेंबरपासून

5) नुकतेच केव्हा ऑल इंडिया रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडतील?
उत्तर - 25 ऑगस्ट रोजी

6) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित या कोणत्या सांस्कृतिक महोत्सवात 10 हजार मुलींनी काश्मिरी लोकनृत्य सादर करून विश्वविक्रम केला आहे?
उत्तर - कशूर रिवाज

7) महिला क्रिकेटमधील T-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ' भारत'चा किती गडी राखून पराभव केला आणि मालिका तीन-शून्य राखून जिंकली?
उत्तर - सात 

8) 'ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर', तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - द्रौपदी मुर्मू

9) केंद्र सरकारने नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - TV सोमनाथन 

10) भारताच्या सहकार्याने कोणत्या देशात तीन मोठे पेट्रोलियम प्रकल्प बांधले जातील?
उत्तर - नेपाळ 

11) अलीकडेच 109 जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती कोणी प्रसिद्ध केल्या आहेत?
उत्तर - नरेंद्र मोदी 

12) अलीकडेच नटवर सिंह यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - राजकारणी