8 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 08 सप्टेंबर
2) अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान कोणत्या दिवशी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत?
उत्तर - 08 सप्टेंबर
3) यूएस ओपन 2024 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावले?
उत्तर - आरिना सबालेन्का
4) स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशन 'आशा शिष्यवृत्ती' कार्यक्रमांतर्गत किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे?
उत्तर - 10 हजार गुणवंत विद्यार्थ्यांना
5) 'ऑल इंडिया फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स सोसायटी'ने 08 सप्टेंबरपासून कोणते प्रदर्शन आयोजित केले आहे?
उत्तर - 'ह्यूजेस' हे पाच दिवसीय राष्ट्रीय गट कला प्रदर्शन
6) केंद्र सरकारने नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - तुहिन कांत पांडे
7) उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी 07 सप्टेंबर रोजी कोणत्या ठिकाणी 'सैनिक स्कूल'चे उद्घाटन केले?
उत्तर - गोरखपूर, उत्तर प्रदेश
8) पंचायती राज मंत्रालय आणि युनिसेफ यांनी कोणत्या हेतूच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - सामाजिक बदलाच्या प्रणालींना बळकट करण्याच्या हेतूच्या पत्रावर
9) परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर कोणत्या परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रियाधला भेट देतील?
उत्तर - भारत-आखाती सहकार्य परिषद
10) 30 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत किती वाढ झाली आहे?
उत्तर - $2.299 अब्ज
11) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपले पहिले प्रादेशिक कार्यालय देशाबाहेर कुठे उघडले आहे?
उत्तर - दुबई
12) भारताने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-4चे प्रक्षेपण कोठे केले?
उत्तर - ओडिशा
13) राजस्थान रॉयल्सचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले?
उत्तर - राहुल द्रविड
14) बिझनेस रिफॉर्म्स ॲक्शन प्लॅन-2022 ची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्र सरकारने कोणत्या राज्याला "नागरिक सेवांमधील सर्वोच्च यशवंत श्रेणी" मध्ये सन्मानित केले आहे?
उत्तर - मध्य प्रदेश
15) केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी कोणत्या राज्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले आहे?
उत्तर - बिहार
No comments:
Post a Comment