7 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) 7 सप्टेंबरपासून कोणता सण देशभरात साजरा केला जातो?
उत्तर: गणेशोत्सव.
2) ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: 07 सप्टेंबर रोजी.
3) भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?
उत्तर: अग्नी 4 क्षेपणास्त्राची.
4) नितिका हिने कुठे जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे?
उत्तर: स्पेनमध्ये 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत.
5) प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर: पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत.
6) केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 07 सप्टेंबर रोजी कोणत्या दोन ठिकाणी रुग्णालयांचे उद्घाटन केले?
उत्तर: दरभंगा आणि मुझफ्फरपूर.
7) होकाटो हॉत्झे सेमा यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणत्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले?
उत्तर: पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत.
8) मॉर्गन स्टॅनले कॅपिटल इंटरनॅशनलच्या इमर्जिंग मार्केट्स इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्समध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकले आहे?
उत्तर: चीनला.
9) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आणखी किती विमानतळांवर 'डिजी यात्रा सुविधा'चे उद्घाटन केले आहे?
उत्तर: 9 विमानतळांवर.
10) 'नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप' (NPG) ची 78 वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर: नवी दिल्ली येथे.
11) हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्या दोन कुस्तीपटूंनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे?
उत्तर: बजरंग पुनिया आणि विनेश फोगट.
12) 06 सप्टेंबर 2024 रोजी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी माजी सैनिकांसाठी (ESM) रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले?
उत्तर: रांची.
13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जलसंचय जन भागिदारी' कार्यक्रम कोठे सुरू केला आहे?
उत्तर: सूरत.
14) फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर: मिशेल बार्नियर.
15) मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज (CSAR) ची 2024 आवृत्ती भारत आणि UNESCO ने कोठे आयोजित केली आहे?
उत्तर: पॅरिस.
16) भारतातील पहिला फॅशन अंदाज उपक्रम 'Vizio NXT' कोणी सुरू केला आहे?
उत्तर: गिरीराज सिंह.
17) उत्तर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची दुसरी प्रादेशिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर: चंदीगड.
No comments:
Post a Comment