15 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) 'राष्ट्रीय अभियंता दिवस' भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 15 सप्टेंबर
2) ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा ने किती मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले?
उत्तर - 87.86 मीटर
3) श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका कधी होणार आहेत?
उत्तर - 21 सप्टेंबर 2024
4) कोणत्या आफ्रिकन देशात 'एमपॉक्स लसीकरण मोहीम' 2 ऑक्टोबरपासून राबविली जाणार आहे?
उत्तर - काँगो
5) '55 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2024' कोठे होणार आहे आणि कधी?
उत्तर - गोव्यात, 20 ते 28 नोव्हेंबर 2024
6) गुजरातमधील राजकोट येथे कोणत्या बैठकीचे अध्यक्षस्थान कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया करतील?
उत्तर - पश्चिम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तिसऱ्या प्रादेशिक बैठकीचे
7) राजस्थानमध्ये वैद्यकीय शिक्षण कोणत्या भाषेतूनही उपलब्ध होणार आहे?
उत्तर - हिंदी
8) गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त कोणत्या विभागाला "राजभाषा कीर्ती पुरस्कार" देऊन सन्मानित केले?
उत्तर - प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग
9) नागरी विमान वाहतूक मंत्रालय कोणत्या कालावधीत विशेष मोहिम 4.0 मध्ये सहभागी होणार आहे?
उत्तर - 2 ते 31 ऑक्टोबर 2024
10) बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय संघाने कोणत्या गटात विजय मिळवला आहे?
उत्तर - खुल्या आणि महिला दोन्ही गटात
11) यूएस स्टेट डिपार्टमेंटने कोणत्या देशाच्या सरकारी मीडिया कंपनी RT वर बंदी घातली आहे?
उत्तर - रशिया
12) केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय ठेवले आहे?
उत्तर - श्री विजयपुरम
13) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2024 चे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - नवी दिल्ली
14) 'नॅशनल एनर्जी लीडर अवॉर्ड' कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला मिळाला आहे?
उत्तर - राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
15) नागालँडच्या प्रतिष्ठित ब्रिलॅन्टे पियानो महोत्सवाची 5वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे?
उत्तर - बेंगळुरू
No comments:
Post a Comment