14 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


14 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 14 सप्टेंबर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय हिंदी दिवस

2) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने 13 सप्टेंबर रोजी कोणती नवीन सुविधा लाँच केली आहे?
उत्तर - मल्टिपल जर्नी QR तिकिटे


3) नागालँडच्या प्रतिष्ठित 'ब्रिलांट पियानो फेस्टिव्हल 2024' ची 5वी आवृत्ती कोठे होणार आहे?
उत्तर - बेंगळुरू

4) केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय केले आहे?
उत्तर - श्री विजयपुरम

5) 'डीडी नॅशनल' चॅनेलचा वर्धापनदिन कोणत्या दिवशी आहे?
उत्तर - 15 सप्टेंबर

6) 'स्वच्छता ही सेवा अभियान 2024' कोणत्या कालावधीत साजरा होणार आहे?
उत्तर - 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर

7) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 13 सप्टेंबर रोजी कोणत्या परिषदचे उद्घाटन केले?
उत्तर - 7वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद 2024

8) बेलारशियन बॉडीबिल्डर इल्या 'गोलेम' येफिमचिक यांचे निधन कशामुळे झाले आहे?
उत्तर - हृदयविकाराचा झटका

9) DRDO ने भारतीय लष्करासाठी विकसित केलेल्या कोणत्या टँकची यशस्वी चाचणी घेतली आहे?
उत्तर - झोरावर लाइट बॅटल टँक

10) महाराष्ट्र सरकार कोणत्या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार आहे?
उत्तर - नाशिक

11) सिंगापूर साहित्य पुरस्कार कोणत्या भारतीय लेखकाला मिळाला आहे?
उत्तर - प्रशांती राम

12) केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोचीन शिपयार्ड येथे बांधल्या जाणाऱ्या कोणत्या मोठ्या प्रकल्पाची पायाभरणी केली?
उत्तर - देशातील सर्वात मोठ्या ड्रेजरची

13) 'ट्रेझर्स ऑफ द गुप्त एम्पायर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - डॉ. संजीव कुमार

14) भारतीय लष्कर आणि कोणत्या देशाच्या लष्करामध्ये 'अल नजह' संयुक्त सराव सुरू झाला आहे?
उत्तर - ओमान

15) कोणत्या राज्य सरकारने माजी अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी 10 टक्के आरक्षण आणि वयात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - ओडिशा

16) भारताने 'व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल'ची यशस्वी चाचणी कोठे केली आहे?
उत्तर - ओडिशा

17) कोणत्या केंद्रीय मंत्र्याने CIFA येथे "कलरफुल फिश" मोबाईल ॲप लाँच केले आहे?
उत्तर - राजीव रंजन सिंग


 

No comments:

Post a Comment