12 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 12 सप्टेंबर रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
उत्तर - दक्षिण-दक्षिण सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस (United Nations Day for South-South Cooperation)
2) महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी 'एशियन क्रिकेट कौन्सिल' ने कोणती स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - महिला अंडर-19 T-20 आशिया कप
3) 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' अंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कवच प्रदान करण्यात येणार आहे?
उत्तर - 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना
4) 45व्या FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या पहिल्या दिवशी भारताने खुल्या गटात कोणता देश पराभूत केला?
उत्तर - मोरोक्को
5) परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत?
उत्तर - स्वित्झर्लंड
6) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या पुरस्काराने परिचारिकांचा गौरव केला?
उत्तर - नॅशनल फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024
7) केरळ सरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची परिषद कोणत्या शहरात आयोजित केली आहे?
उत्तर - तिरुवनंतपुरम
8) भारतीय हवाई दलाने जोधपूरमध्ये कोणता सराव आयोजित केला आहे?
उत्तर - तरंग शक्ती-24
9) नागालँड सरकारने कोणत्या जिल्ह्यांसाठी इनर लाइन परमिट लागू करण्यास मान्यता दिली आहे?
उत्तर - दिमापूर, चुमाउकेडिमा आणि न्यूलँड
10) सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ज्युनियर बॉईज कपचे विजेते कोण झाले आहेत?
उत्तर - टी. होय इंग्लिश स्कूल, मणिपूर
11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे कोणत्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले?
उत्तर - सेमिकॉन इंडिया 2024
12) 'गंगा संवर्धन सशक्त टास्क फोर्स'ची 12वी बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली?
उत्तर - केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील
13) 45 वे FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाड कोठे सुरू झाले आहे?
उत्तर - बुडापेस्ट
14) नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची दुसरी आशिया पॅसिफिक मंत्रीस्तरीय परिषद कोठे सुरू होईल?
उत्तर - नवी दिल्ली
15) टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडने कोणत्या परदेशी कंपनीसोबत एअरलिफ्टर प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण करार केला आहे?
उत्तर - लॉकहीड मार्टिन
16) भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला रु. 2.91 कोटी दंड ठोठावला आहे?
उत्तर - ॲक्सिस बँक
17) संयुक्त राष्ट्र महासभेचे 79 वे अधिवेशन कोठे सुरू झाले?
उत्तर - न्यूयॉर्क
No comments:
Post a Comment