2 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 02 सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक नारळ दिन
2) 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' भारतात केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 1 ते 30 सप्टेंबर
3) सर्वोच्च न्यायालयाचा नवा ध्वज आणि बोधचिन्ह कोणत्या व्यक्तीने जारी केले?
उत्तर - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
4) पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज रुबिना फ्रान्सिसने कोणत्या प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे?
उत्तर - महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात
5) भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर - एअर मार्शल तेजिंदर सिंग
6) जर्मनीतील हॅनोव्हर येथे झालेल्या कर्णबधिर नेमबाजी स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य (एकूण चार पदके)
7) वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन 2024 मध्ये किती भारतीय स्पर्धक भाग घेतील?
उत्तर - 60 भारतीय स्पर्धक 61 स्पर्धांमध्ये
8) 'संगीत कला विभूषण जीवनगौरव पुरस्कार' कोणत्या उस्तादाला दिला गेला?
उत्तर - शेषमपट्टी शिवलिंगम
9) ICC T20 विश्वचषक आशिया पात्रता फेरीमध्ये हाँगकाँगने कोणत्या संघाचा पराभव केला?
उत्तर - मंगोलिया
10) केंद्र सरकारने अलीकडेच कोणते जैवतंत्रज्ञान धोरण जारी केले आहे?
उत्तर - बायो ई-३
11) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - अवनी लेखरा
12) कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' ला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत?
उत्तर - ब्राझील
13) पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - मलेशिया
14) भारतात पहिली दोन दिवसीय जॉइंट कमांडर्स परिषद कोठे सुरू होईल?
उत्तर - लखनौ
15) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - डॉ. टी.व्ही. सोमनाथन
No comments:
Post a Comment