6 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


6 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 06 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - हिरोशिमा डे 

2) बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - शेख हसीना यांनी 

6 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) राष्ट्रपती ' द्रौपदी मुर्मू ' यांनी 06 ऑगस्ट रोजी कोणत्या देशाच्या संसदेला संबोधित केले?
उत्तर - फिजीच्या

4) भारत 06 ऑगस्टपासून कोठे 'तरंग शक्ती 2024' या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन करणार आहे?
उत्तर - सुलार, तामिळनाडू येथे 

5) केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, 2014 पासून परदेशातून किती प्राचीन कलाकृती' परत आणण्यात आल्या आहेत?
उत्तर - 345

6) इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या ​​कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ५५ व्या 

7) नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी आणि केरळमधील चुलान्नूरला ' मयूर अभयारण्य' म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - कर्नाटक

8) राष्ट्रीय महिला आयोगाने केव्हा नवी दिल्ली येथे महिलांसाठी डिजिटल शक्ती मोहिमेअंतर्गत ' डिजिटल शक्ती केंद्र' चे उद्घाटन केले?
उत्तर - 05 ऑगस्ट रोजी 

9) नुकताच कोणता खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे?
उत्तर - अविनाश साबळे

10) भारतीय हवाई दलाने 200 एस्ट्रा मार्क-1 क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी कोणत्या सार्वजनिक उपक्रमाला मान्यता दिली आहे?
उत्तर - भारत डायनॅमिक्स लिमिटेड

11) कोणत्या राज्य सरकारने सर्व पिकांची MSP वर खरेदी करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - हरियाणा 

12) आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर - नागालँड


 

No comments:

Post a Comment