29 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
2) नुकतेच कोणत्या देशाने महिला आशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - श्रीलंके'ने
29 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकताच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ला त्यांच्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी कोणता अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे ?
उत्तर - ग्लोबल वॉटर टेक अवॉर्ड 2024
4) शिक्षण मंत्रालय 29 जुलै रोजी नवी दिल्लीतील ' माणेकशॉ सेंटर ऑडिटोरियम' येथे अखिल भारतीय शैक्षणिक शिखर परिषद, 2024 सोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या अंमलबजावणीचा कितवा वर्धापन दिन साजरा करेल?
उत्तर - चौथा
5) सर्वोच्च न्यायालय' 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष कोणत्या साप्ताहाचे आयोजन करणार आहे?
उत्तर - लोकअदालत सप्ताहाचे
6) दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशाने भगवान राम आणि भगवान बुद्धांच्या चित्रांसह एक टपाल तिकीट जारी केले आहे?
उत्तर - लाओस
7) नेमबाजीपटू ' मनु भाकेर' हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम सामन्यात कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक
8) नुकताच केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - जीवनगौरव पुरस्कार
9) नुकतेच IIT खरगपूरने कोणाला मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे?
उत्तर - Google CEO सुंदर पिचाई यांना
10) कोणत्या देशाने आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?
उत्तर - भारत
11) सांस्कृतिक श्रेणीतील 43 व्या UNESCO जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या राज्यातील मोईदमांना मिळाला आहे?
उत्तर - आसाम
12) NITI आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?
उत्तर - नरेंद्र मोदी
No comments:
Post a Comment