29 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) ' राष्ट्रीय क्रीडा दिन ' दरवर्षी भारतात केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 29 ऑगस्ट रोजी
2) ब्राझीलमध्ये '17 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स'मध्ये भारतीय तुकडीने कोणती व किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - एक सुवर्ण आणि चार रौप्य पदके
3) नुकतीच देशाच्या दहशतवाद विरोधी दलाच्या महासंचालकपदी - राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी बी. श्रीनिवासन यांची
4) Apple's Beat ने कोणाला आपली ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे?
उत्तर - बॉलिवूड अभिनेत्री ' अनन्या पांडे' हिला
5) नुकतीच कॉलरा टाळण्यासाठी नवीन तोंडी लस कोणी विकसित केली आहे?
उत्तर - भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने
6) IBSF अंडर-17 स्नूकर चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - ख्रिश्चन रिक्टरने
7) नुकताच AI-powered शॉपिंग असिस्टंट चॅटबॉट 'Rufus' भारतात कोणी लॉन्च केला आहे .
उत्तर - Amazon ने
8) नुकताच पार्किन्सन रोगाच्या व्यवस्थापनासाठी औषधांचा डोस समायोजित करण्यासाठी एक नवीन स्मार्ट सेन्सर कोणी विकसित केला आहे?
उत्तर - भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञांनी
9) 'ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट' (BPRD) ने केव्हा नवी दिल्ली येथील मुख्यालयात आपला 54 वा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - 28 ऑगस्ट रोजी
10) नुकतीच ' नवी दिल्ली' येथे 17 वी भारत-इस्रायल परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत केव्हा आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - 28 ऑगस्ट रोजी
11) नुकतेच उत्तर प्रदेशातील नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे '10 व्या आंतरराष्ट्रीय औषध प्रदर्शन' IPHEEX चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - केंद्रीय मंत्री जतिन प्रसाद यांनी
12) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या प्रोग्राम अंतर्गत ' 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे देशातील औद्योगिक परिदृश्य बदलला जाईल?
उत्तर - नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत
13) पॅरालिम्पिक खेळ कोणत्या देशात सुरू झाले आहेत?
उत्तर - पॅरिस
14) आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावरील भारतीय आणि रशियन आयोगाची दुसरी संयुक्त बैठक कोठे सुरू झाली?
उत्तर - मॉस्को
15) कोणत्या इस्लामिक देशात प्रथमच महिला सरकारच्या प्रवक्त्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - इराण
16) 24 वा आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर - दुबई
No comments:
Post a Comment