20 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1.भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर - भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
2.भारत आणि जपान यांच्यातील तिसरी बैठक कधी आणि कोठे होणार आहे?
उत्तर - भारत आणि जपान यांच्यातील तिसरी बैठक 20 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
3.पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांशी 20 ऑगस्ट रोजी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी 20 ऑगस्ट रोजी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
4.India-EU Track 1.5 प्रादेशिक परिषदेचे आयोजन कधीपासून होणार आहे?
उत्तर - India-EU Track 1.5 प्रादेशिक परिषदेचे आयोजन 21 ऑगस्टपासून होणार आहे.
5.19 व्या CII भारत-आफ्रिका बिझनेस समिटमध्ये कोणते देशाचे उपाध्यक्ष सहभागी झाले?
उत्तर - लायबेरियाचे उपाध्यक्ष जेरेमिया कपन काँग 19 व्या CII भारत-आफ्रिका बिझनेस समिटमध्ये सहभागी झाले.
6.भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन कधी झाले?
उत्तर -भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन झाले आहे.
7.पंकज अडवाणीने कोणती स्पर्धा जिंकली आहे?
उत्तर - पंकज अडवाणीने वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे.
8.माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे निधन कोठे आणि कोणत्या वयात झाले?
माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे निधन चेन्नई येथे वयाच्या 83 व्या वर्षी झाले.
9.थायलंडचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
थायलंडचे नवे पंतप्रधान पेटोंगटार्न शिनावात्रा आहेत.
10.'फर्स्ट पॉलिसी मेकर फोरम'चे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले?
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी 'फर्स्ट पॉलिसी मेकर फोरम'चे उद्घाटन केले.
No comments:
Post a Comment