19 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) नुकताच टी-20 संघाचा नवा कर्णधार कोण झाला आहे?
उत्तर - सूर्यकुमार यादव
2) नुकतेच कोणी मॉरिशसमध्ये भारतातील पहिल्या ' विदेशी जनऔषधी केंद्रा'चे उद्घाटन केले?
उत्तर - केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी
19 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकताच 'बेलारूस' 19 जुलै रोजी किती युरोपीय देशांसाठी व्हिसामुक्त धोरण जाहीर करणार आहे?
उत्तर - 35
4) महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेच्या 9व्या आवृत्तीला केव्हापासून श्रीलंकेतील डंबुला येथे सुरुवात होणार आहे?
उत्तर - 19 जुलैपासून
5) नागरी उड्डाणावरील दुसरी ' आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद' (APAC) भारतात केव्हापासून सुरु होणार आहे?
उत्तर - 11-12 सप्टेंबर 2024 पासून
6) नुकतीच कोणी राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन 'मानस' 1933 सुरू केली आहे?
उत्तर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
7) नुकतेच नवी दिल्लीत ' लोकसंवर्धन पर्व'चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी
8) नुकतेच गुजरातमधील राजकोट येथे ' इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑडिट ऑफ लोकल गव्हर्नन्स' (iCAL) चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांनी
9) नुकतेच चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने कोणत्या ठिकाणी आपली नवीनतम आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स अकादमी उघडण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे
10) अलीकडेच पंतप्रधानांनी 'पॉवर विदिन: द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या प्रतीवर स्वाक्षरी केली आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - डॉ. आर. बालसुब्रमण्यम
11) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील किती खेळाडू सहभागी होतील?
उत्तर - 117
12) कोणत्या राज्य सरकारने अग्निशामक कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये '10% आरक्षण' देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - हरियाणा
13) वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024 मध्ये कांस्य पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - शौर्य बावा
14) तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर - नेरेला शारदा
No comments:
Post a Comment