15 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 78 वा स्वातंत्र्यदिन
2) थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने कोणाची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली आहे?
उत्तर - पंतप्रधान 'श्रेथा थाविसिन'
3) नुकताच टीम इंडियाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक कोण बनला आहे?
उत्तर - दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ' मॉर्ने मॉर्केल'
4) भारतातील पहिल्या शून्य कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) च्या एअरपोर्ट कार्बन ॲक्रेडिटेशन (ACA) कार्यक्रमांतर्गत ही मान्यता प्राप्त झाली आहे.
उत्तर - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला
5) नुकताच पोलाद मंत्रालयात सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - 1993 बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी ' संदीप पौंडरिक' यांनी
6) डिजिटल आरोग्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि कोणत्या विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
7) जागतिक बॅडमिंटन संघटनेने कोणत्या पॅरा बॅडमिंटन खेळाडूला 18 महिन्यांसाठी निलंबित केले आहे?
उत्तर - प्रमोद भगत
8) कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती मोहम्मद जावद झरिफ यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर 11 दिवसांनी राजीनामा दिला आहे?
उत्तर - इराण
9) सहाव्या भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवादाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - कॅनबेरा
10) वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 साठी संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - जगदंबिका पाल
No comments:
Post a Comment