13 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी कोणता दिवस जगभरात साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक अवयवदान दिन
2) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी कोणती संस्था एकंदर श्रेणीत अव्वल स्थानावर आहे?
उत्तर - 'IIT मद्रास'
3) नुकतीच हॉकी इंडियाने यांची कोणाची भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - पीआर श्रीजेश
4) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हस्तांतरण' वर 5 वे थेट सत्र आयोजित करेल?
उत्तर - 13 ऑगस्ट रोजी
5) नुकतेच कोणी अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - माजी परराष्ट्र सचिव ' विनय मोहन क्वात्रा' यांनी
6) IRCTC, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या सहकार्याने, नमो भारत ट्रेन आणि इतर ट्रेनमधील प्रवाशांसाठी कोणता उपक्रम सुरू करणार आहे?
उत्तर - वन इंडिया-वन तिकीट
7) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी संपूर्ण राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे ?
उत्तर - HIM-UNNATI
8) सॅनिटरी पॅडसाठी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात निधी पाठवणारे कोणते राज्य सरकार देशातील पहिले राज्य ठरले आहे?
उत्तर - मध्य प्रदेश
9) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पदकतालिकेत कोणते स्थान पटकावले आहे?
उत्तर - 71 वा
10) पहिली जागतिक महिला कबड्डी लीग कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल?
उत्तर - हरियाणा
11) 7 वी हीरोज इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित केली आहे?
उत्तर - बँकॉक
12) लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याला 'पार्दो अल्ला कॅरीरा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - शाहरुख खान
No comments:
Post a Comment