15 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

Current affairs marathi 2024

15 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी १५ जून रोजी जगभरात  कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - ग्लोबल विंड डे

2) ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक चाचण्यांमध्ये जलतरणपटू एरियन एलिझाबेथ टिटमस हिने किती मीटर फ्रीस्टाइल विश्वविक्रम नोंदवला?
उत्तर - महिला 200 मीटर फ्री स्टाईल

15 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून अलीकडे कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - पेमा खांडू 

4) भारतातील पहिले संरक्षण ETF नुकतेच कोणत्या नावाने लाँच करण्यात आले?
उत्तर - मोतीलाल ओसवाल निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड

5) पुन्हा एकदा  दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - सिरिल रामाफोसा

6) वेस्ट इंडिजचा कोणता फिरकीपटू  याची मे 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे?
उत्तर - गुणकेश मोती

7) नुकताच भारत ' नायट्रस ऑक्साईड' (N2O) उत्सर्जित करणारा जगातील कितवा देश बनला आहे?
उत्तर - दुसरा 

8) नुकतेच जागतिक पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने कोठे आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
उत्तर - काठमांडू

9) आसाम सरकारने बालविवाह रोखण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
उत्तर - निजूत मोइना योजना

10) नुकतीच भारताच्या ' दिव्या देशमुख' हिने कोणती स्पर्धा जिंकली आहे?
उत्तर - मुलींची जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा

11) कोणत्या अंतराळ संस्थेच्या एक्सोमार्स आणि मार्स एक्सप्रेस मिशनने मंगळावर बर्फ शोधला आहे?
उत्तर - युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)

12) कोणत्या ग्रहाच्या विषुववृत्ताजवळ बर्फाचे अस्तित्व आढळून आले आहे?
उत्तर - मंगळ


 

No comments:

Post a Comment