३ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) कोणत्या पुस्तकाला "वर्ल्ड बुक ऑफ द इयर 2023" पुरस्कार देण्यात आला आहे?
उत्तर - द टॉम्ब ऑफ सैंड
2) केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडी मध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे?
उत्तर - ७
3) नुकतेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयंम प्लस पोर्टल लाँच केले आहे?
उत्तर - शिक्षण मंत्रालय
4) स्वीडन हा देश NATO संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे?
उत्तर - 32 वा
5) फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू व सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे?
उत्तर - 1.68
6) भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अनुराग अगरवाल
7) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुधारीत निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मच्याऱ्यासांठी लागू आहे?
उत्तर - 1 नोव्हेंबर 2005
8) कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मच्याऱ्यासांठी सुधारीत निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे?
उत्तर - महाराष्ट्र
9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदूस्थान खते व रसायन लिमिटेड च्या ८९०० कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे?
उत्तर - झारखंड
10) प्रो कबड्डी लीग स्पर्धा २०२४ चा विजेता संघ पुणेरी पलटण चे हे कितवे विजेतेपद आहे?
उत्तर - पहिले
11) प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणुन कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर - भारतीय डाक विभाग
12) महाराष्ट्र विधानसभेत मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर महापालिकेत किती सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे?
उत्तर - 4
No comments:
Post a Comment