२६ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) अलीकडेच २५ फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा झाला?
उत्तर - ‘लेट्स ऑल ईट राइट डे‘
2) भारतातील पहिल्या महिला डॉक्टरचे नाव काय आहे, ज्यांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी साजरी केली जात आहे?
उत्तर - आनंदी गोपाळ जोशी, 26 फेब्रुवारी 1887 रोजी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.
26 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेचे कोणत्या देशाने अलीकडेच भारतीयांसाठी 5 वर्षांचा 'मल्टी एंट्री व्हिसा' देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - सौदी अरेबिया, दुबई
4) 26 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकाचा जन्म झाला?
उत्तर - मनमोहन देसाई. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 रोजी मुंबईत झाला. मनमोहन देसाई यांनी कुली, मर्द, अमर अकबर अँथनी असे अनेक मोठे सुपरहिट चित्रपट दिले आणि अनेक स्टार्सना सुपरस्टार बनवले.
5) महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाबाबत हरियाणा सरकारने अलीकडे कोणता कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर - सवेरा, या कार्यक्रमांतर्गत महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येणार आहे.
6) भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला?
उत्तर - रविचंद्रन अश्विन. यापूर्वी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 350 बळी पूर्ण केले होते.
7) अलीकडेच पीएम मोदींनी कल्की मंदिराची पायाभरणी केली आहे. हे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - उत्तर प्रदेशातील संभल जिह्यात
8) कोणत्या प्रसिद्ध गुंतवणूकदाराने अलीकडेच ओपन एआय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे?
उत्तर - Amazon कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी openAi च्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मानवासारखे रोबोट विकसित करत आहे. २०२२ मध्ये openAi चे chatgpt लाँच झाल्यापासून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणूक वाढली आहे.
9) भारत आणि कोणता देश यांच्यातील 'धर्म संरक्षक' हा संयुक्त सराव नुकताच राजस्थानमध्ये सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - जपान
10) खालीलपैकी कोणत्या देशात सुहास यथीराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नगर यांनी पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - थायलंड
11) नुकताच केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये कोणता सण साजरा करण्यात आला?
उत्तर - 'अट्टुकल पोंगल सण'
12) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात राज्यात देशातील कोणत्या सर्वात लांब केबल ब्रिज चे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - सुदर्शन ब्रिज
13) 'महाबीज-2024' कुठे आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर - दुबई
14) राष्ट्रपतींनी नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
उत्तर - ए एस राजीव
15) भारतातील सर्वात मोठी 'रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन' (RPTO) कोठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - IIT गुवाहाटी
16) अलीकडेच नरेंद्र नारायण यादव यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे?
उत्तर - बिहार
17) भारतातील सर्वात मोठे 'संरक्षण उपकरण प्रदर्शन' कोठे सुरू झाले आहे?
उत्तर : पुण्याजवळील मोशी
18) 'नॅशनल पब्लिक हेल्थ इंडिया कॉन्फरन्स 2024' कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - दिल्ली
19) नुकताच 'डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स'चा 77 वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 25 फेब्रुवारी
20) UAE सरकारने भारतीय पर्यटकांच्या व्हिसाचा कालावधी किती वर्षांपर्यंत वाढवला आहे?
उत्तर - ५ वर्ष
No comments:
Post a Comment